केंद्रीय मंत्री राम विलास पासवान आयसीयुत

केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टीचे संस्थापक राम विलास पासवान यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या आयसीयूत उपचार घेत आहेत. ऐन बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पासवान यांना रुग्णालयात राहावे लागत असल्याने त्यांनी आपले पुत्र आणि एलजेपी अध्यक्ष चिराग पासवान यांना एनडीएतील जागावाटप आणि निवडणूक प्रचारावर लक्ष ठेवायला सांगितले आहे. मात्र गेले काही दिवस वडिलांच्या प्रकृतीच्या चिंतेमुळे चिराग हे पाटण्याला गेलेले नाहीत. त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना, चिंता नको. मी लवकरच बिहारला परतेन असा संदेश पाठवला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या