अनोळखी ईमेलपासून सावधान!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे अनेक जण सध्या घरातून ऑफिसचे काम करत आहेत. त्यामुळे त्यांचा पहिल्यापेक्षा जास्त वेळ इंटरनेटवर जात आहे आणि याचाच गैरफायदा उचलण्यासाठी सायबर गुन्हेगार सक्रीय झाले आहेत.

बँक फसवणुकीच्या प्रकरणांत सतत वाढ होत आहे. दररोज अशी अनेक प्रकरणे कानावर येत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी सुरक्षेवर लक्ष देणे गरजेचे आहे. हॅकर्स अनेक प्रकारे लोकांना लक्ष्य करत आहेत. सायबर गुन्हेगार सर्वात जास्त ’फिशिंग’ या प्रकाराचा वापर करत आहेत.

फिशिंग काय असतं?
फिशिंग ही जगासमोरची समस्या आहे. केवळ हिंदुस्थानच नव्हे तर जगभरातील बँका या समस्येचा सामना करत आहेत. फिशिंग एखाद्या इमेलच्या स्वरूपात असू शकतो, जो कोणत्याही प्रसिद्ध संस्था, बँका किंवा लोकप्रिय वेबसाईटसारखा वाटू शकतो. लक्षात ठेवा बँका कोणतीही गोपनीय माहिती उदा. लॉगईन आयडी, ट्रान्जॅक्शन पासवर्ड, वन टाईम पासवर्ड, युनिक रेफरेन्स नंबर कधीच विचारत नाही.

z सायबर गुन्हेगार कोणतीही प्रतिष्ठाrत वित्तीय संस्था किंवा लोकप्रिय शॉपिंग वेबसाईट प्रमाणे दिसणारे पेज तयार करते.
z त्यानंतर युजर्सला एकत्रित ईमेल्स पाठवले जातात. त्यामध्ये अकाऊंट डिटेल्स, पासवर्ड सारखी खासगी माहिती विचारली जाते.
z जेव्हा युजर या लिंकवर क्लिक करतो, तेव्हा बनावट वेबसाईट उघडली जाते. किंवा ज्याच्यावर युजर ऑनलाईन असतो, तिथे सेशन पॉप अपच्या माध्यमातून एक फॉर्म येतो.
z अशाप्रकारे तुमचा डेटा सायबर गुन्हेगारांकडे पोचतो. त्यानंतर युजर असली वेबसाईटकडे रिडायरेक्ट
होतो.

फिशिंग ईमेल कसे ओळखाल?
z सुरक्षेचे कारण देऊन तत्काळ अॅक्शन घ्यायला सांगणारे मॅसेज हे फिशिंग ईमेल असू शकतात.
z खरी वेबसाईट चेक करताना लिंकवर कर्सर नेऊन http:// ला चेक करा. तिथे S असं आलं तर समजा ती वेबसाईट सुरक्षित आहे.
z गुन्हेगार कोणत्याही लोकप्रिय बँकेचा ईमेल अॅड्रेस, डोमेन नेम, व्यक्ती आदींचा वापर करू शकतात. त्यातून नकली ईमेलला हुबेहूब खऱया साईट्ससारखे रूप दिले जाते.
z ’डियर नेट बँकिंग कस्टमर’ किंवा ’डियर बँक कस्टमर’ अशी सुरुवात करून नकली ईमेल येतात. लक्षात ठेवा, बँकेचे प्रमाणित ईमेल नेहमी आपल्या नावाने संबोधून येतात.
z बनावट ईमेलमध्ये व्याकरण, स्पेलिंगच्या अनेक चुका असतात. बनावट ईमेल योग्य पद्धतीने लिहिलेले नसतात.