लातूरात अज्ञात व्यक्तीने 40 हजाराचे साहित्य पळवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुकानात विक्रीसाठी आणलेल्या साहित्याचा बॉक्स ज्यामध्ये सुमारे 40 हजार रुपयांचे साहित्य होते. ते अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. या चोरी प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनोद श्यामसुंदर मंत्री यांनी दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, कापड गल्ली येथे लक्ष्मी जनरल स्टोअर्स नावाचे त्यांचे दुकान आहे. दुकानात विक्रीसाठी आणलेले देवीचे हार (देवाचे कपडे, मुकूट, मोतीहार) अशा वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य असलेला बॉक्स पायऱ्ंयाच्या जवळ ठेवलेला असतानाही अज्ञात व्यक्तीने तो चोरुन घेऊन गेला. सुमारे 40 हजार रुपयांचे साहित्य त्या बॉक्समध्ये होते. सीसीटिव्हीमध्ये बॉक्स घेऊन जात असताना अज्ञात व्यक्ती दिसून येत असल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.