आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा

शिळं अन्न दिलं म्हणून उपाहारगृहातील कर्मचाऱ्याला मारहाण करणारे मिंधे गटाचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात अखेर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला. गायकवाड यांचा मारहाण करतानाचा

व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओच्या आधारे पोलीस अंमलदाराने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.  आमदार निवासातील उपाहारगृहात आमदार संजय गायकवाड यांनी लुंगी-बनियनवर राडा केला होता.