#AYODHYAVERDICT- सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांची खैर नाही, 72 जणांना अटक

काही वेळातच अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय ऐतिहासिक निर्णय देणार आहे. यामुळे संपूर्ण देशाचे याकडे लक्ष असून सुरक्षिततेचा उपाय म्हणून सोशल मीडीयावरही पोलीस लक्ष ठेवून आहेत. तसेच कोणीही चिथावणीखोर पोस्ट टाकू नयेत अशा सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तसेच व्हॉ्सअ्ॅप ग्रुपवर मेसेज पाठवण्यासाठीही मार्गदर्शिका जारी करण्यात आली आहे. व्हॉट्सअॅपवर कोणीही वादग्रस्त मेसेज टाकल्यास ग्रुप अॅडमिनला जबाबदार ठरवण्यात येणार आहे.

उत्तर प्रदेशमध्ये सोशल मीडियावर नजर ठेवण्यासाठी विशेष टीम तयार करण्यात आली आहे. याप्रकरणी 72 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच 670 जणांचे अकाऊंट ब्लॉक करण्यात आले आहे. तर अलीगडमध्ये इंटरनेट बंद ठेवण्यात आले आहे. याव्यतिरिक्त उत्तर प्रदेशमध्ये सोशल मीडियावर वॉच ठेवण्यासाठी टीम बनवण्यात आली आहे.
सायबर क्राईम टीम अयोध्या प्रकरणावर निगेटीव्ह संदेश देणाऱ्यांवर लक्ष ठेवून आहे.

आपली प्रतिक्रिया द्या