योगी सरकारमधील मंत्र्याला 500 रुपयांचा दंड, हाय कोर्टाच्या निर्देशानंतर केसही बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमधील योगी सरकारचे मंत्री मयंकेश्वर शरण सिंह (Mayankeshwar Sharan Singh) यांना 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला असून सुलतानपूर येथील न्यायालयामध्ये उपस्थित राहत त्यांनी हा दंड भरला. 2017 मधील हे प्रकरण असून दंड भरल्याने ही केस बंद करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

2017 मध्ये विधानसभा निवडणुकीवेळी आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी मयंकेश्वर शरण सिंह यांच्यासह त्यांच्या 150 अज्ञात समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मयंकेश्वर शरण सिंह हे योगी सरकारमध्ये आरोग्य राज्यमंत्री असून पाचवेळा ते तिलोई विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर ते आज मुख्य न्यायदंडाधीकारी साइमा सिद्दीकी जर्रार आलम यांच्यासमोर उपस्थित राहिले आणि दंड भरला. दंड भरल्यानंतर त्यांनी केस बंद करण्याचा अर्ज केला.