गोंडा महंत गोळीबारकांड- जमिनीच्या वादातून पुजाऱ्य़ानेच रचला महंतावर गोळीबाराचा बनाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या आठवडय़ात उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्याच्या प्रसिद्ध राम जानकी मंदिराच्या महंतांवर मारेकऱ्य़ांनी बेछूट गोळीबाराचा प्रकार घडला होता.या गोळीबारात जखमी झालेला महंत लखनौत उपचार घेत आहे.पण आता या गोळीबाराच्या चौकशीला वेगळेच वळण लागले आहे. मंदिराच्या इटीयाथोक भागातील तीरेमनोरमा गावातील 120 बिघे जमिनीच्या वादातून मंदिराचा पुजारी महंत सीताराम दास यांने गावचा सरपंच विनय सिंह याच्या साथीनेविरोधकांना फसवण्यासाठी महंतांवरील गोळीबाराचा बनाव रचल्याचे स्पष्ट झाले आहे.या सिनेमा स्टाईल बनावात जखमी महंत सम्राट दास हासुद्धा सामील असल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी 9 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील 7 जणांना ताब्यात घेण्यात आले असून जखमी महंत गावी परतल्यावर त्याला ताब्यात घेतले जाणार आहे. आरोपी सरपंचाचा मुलगा फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

गोंडातील राम जानकी मंदिराचा पुजारी महंत सीताराम दास याने महंत सम्राट दासवरील गोळीबार प्रकरणात त्यांचा विरोधक अमर सिंह याला मुख्य आरोपी बनवण्याचा घाट घातला होता. अमर सिंहला मंदिराची जमीन हवी असल्याने त्याने हा हल्ला करवला असे सीताराम याने तक्रारीत म्हटले होते. पण गोंडा पोलिसांनी फिर्यादी पक्षाचीही कसून चौकशी केली असता महंतांवरील गोळीबार हा पुजारी सीताराम आणि विद्यमान सरपंच विनय सिंह त्यांनी अमर सिंहला अडकवण्यासाठी केल्याचे उघड झाले.या गोळीबाराच्या बनावात जखमी झालेला आणि लखनौच्या किंग जॉर्ज मेडिकल विद्यापीठ रुग्णालयात उपचार घेणारा महंत सम्राट दास हाही सामील असल्याचे चौकशीत उघड झाल्याची माहिती गोंडांचे पोलीस अधीक्षक शैलेंद्र पुमार पांडे यांनी दिली.

काय आहे प्रकरण

गोंडा येथील तीरेमनोरमा गावातील राम जानकी मंदिराची 120 बिघे जमीन आहे. या जमिनीच्या मालकीवरून मंदिराचा पुजारी महंत सीताराम दास आणि गावातील एक स्थानिक पुढारी अमर सिंह यांच्यात अनेक वर्षे वाद सुरू आहे. शिवाय निवडणुकांवरून सरपंच विनय सिंह आणि अमर सिंह यांच्यात वैमनस्य आहे. त्यामुळेच महंत सीताराम दास व सरपंच विनय सिंह यांनी बॉलीवूड स्टाइल हल्ल्याचा बनाव रचून विरोधकांना गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. या बनावात गोळीबार करून महंत सम्राट दास याला जखमी करण्याची सुपारी पुख्यात शूटर मुन्ना सिंह याला देण्यात आली होती. मुन्ना सिंह आणि त्याच्या साथीदारांनी मंदिरात झोपलेल्या सम्राट दासवर गोळ्या झाडून जखमी केले. त्यानंतर हा बनाव रचणारा पुजारी सीताराम दास याने झोपण्याचे नाटक करीत पहाटे महंतावर प्राणघातक हल्ला झाल्याची तक्रार पोलिसांत केली. पण गोंडा पोलिसांनी प्रकरणाची चौकशी केल्यावर गोळीबाराचा बनाव असल्याचे