
सामना ऑनलाईन । लखनौ
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी प्रचारात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे डुप्लीकेट उतरवले आहे. हुबेहूब आदित्यनाथांसारखी दिसणारी ही व्यक्ती प्रचारात सावलीसारखी अखिलेश यांच्यासोबत असते. अखिलेश यांनी गुरुवारी या व्यक्तीसोबतचा चार्टर्ड प्लेनमधील एक फोटो ट्विट केला.
त्यानंतर अनेकांना ते आदित्यनाथ असल्यासारखेच वाटले. अखिलेश यांनीही ट्विट केले की, आम्ही मुख्यमंत्री निवासस्थान सोडताच त्यांनी ते गंगेच्या पाण्याने धुतले. त्यांच्या ट्विटमुळे आणखी चर्चा रंगल्या. त्यानंतर ते आदित्यनाथांचे डुप्लीकेट असल्याचे उघड झाले.
























































