Nagar : रस्ते कंत्राटदाराची उघड चौकशी व्हावी, शिवसेनेच्या नगरसेवकाची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका वैशिष्टपूर्ण योजनेअंतर्गत तत्कालीन मुख्यमंत्री यांनी नगर शहरातील कामांसाठी 2017 साली दिलेल्या 10 कोटींच्या निधी उपायांमधील नगर शहरातील आडते बाजार, चितळे रोड येथील रस्ता न बनवता शासनाकडून 14 लाख 93 हजार व 19 लाख 17 हजार रुपये अनाधिकाराने संगनमताने, भ्रष्टमार्गाचा अवलंब करून लाटल्याप्रकरणी मे. ए.सी. कोठारी, कंत्राटदाराविरुद्ध सत्यशोधक उघड चौकशी होऊन लाचलुचपत प्रतीबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक यांच्या कडे पत्राद्वारे केली आहे.

बोराटे यांनी पत्रामध्ये म्हणले की, सदर प्रकरण अत्यंत गंभीर असून राज्य शासनाने नागरिकांना चांगले रस्ते मिळण्यासाठी महापालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांचा विकास योजनेअंतर्गत नगर महानगरपालिकेच्या कामासाठी 10 कोटी रुपये निधी सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर यांना वर्ग केला आहे.

यापैकी रामचंद्रखुंट ते तेलीखुंट व चितळे रोड येथे कोणताही रस्ता न बनवता कंत्राटदार मे. ए.सी. कोठारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून, संगनमत करून शासनाच्या 14 लाख 93 हजार व 19 लाख 17 हजार अनाधिकाराने, संगनमताने भ्रष्टमार्गाने लाटले आहेत याची सखोल सत्य शोधक उघड चौकशी त्वरित अतिजलद करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे असे ते म्हणाले.

सदर प्रकरणी आडते बाजार व चितळे रोड येथे रस्ता न बनवता या कामाचे अनाधिकाराने, संगनमताने, कटकारस्थान रचून शासनाची रक्कम रु. 14 लाख 93 हजार व 19 लाख 17 हजार रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी व सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर भ्रष्टाचारात सामील होऊन कंत्राटदार मे. ए.सी. कोठारी यास मदत केल्या प्रकरणी वरील सर्वांविरुद्ध सखोल उघड चौकशी करून झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायदा अन्वये फोजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा असे म्हणले आहे.

तसेच तत्कालीन युती शासनाने नागरीकांना चांगले रस्ते मिळण्यासाठी महापालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांचा विकास योजनेअंतर्गत वर्ग केलेल्या 10 कोटी रुपये निधी च्या कामांची देखील पाहणी करून व सखोल चौकशी करुन तफावत आढळल्यास दोषींवर गुन्हे दाखल करावेतअशी विनंती नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केली आहे.

नगर शहरातील मध्यवर्ती अशा शहर हद्दीमध्ये या निधीच्या माध्यमातून अनेक रस्ते विकसित केले जाणार होते,2017 साली हा निधी मंजूर करून तो मिळालेला होता आज पर्यंत यातील अनेक कामे ही प्रलंबित आहे, या संदर्भामध्ये शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते व उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांच्यासह शिवसैनिकांनी या विषयासंदर्भात मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जा विचारून आंदोलन सुद्धा केले होते आता याच निधीतून परस्पर रित्या बोगस काम करून निधी मिळवल्या संदर्भात नगरसेवक बोराटे यांनी लेखी तक्रार दाखल केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे या संदर्भामध्ये जोपर्यंत या विषयाचा तडा लागणार नाही तोपर्यंत हा विषय आम्ही लावून जाणार असल्याचे नगरसेवक बोराटे यांनी सांगितले.