सहा वर्षीय रुपसाने जिंकला ‘सुपर डान्सर’चा किताब आणि 15 लाखांचे बक्षिस

89

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

टीव्हीवरील प्रसिद्ध डान्स रिएलिटी शो ‘सुपर डान्सर चॅप्टर -3’ चा विजेता घोषित झाला आहे. कोलकातामध्ये राहणाऱ्या सहा वर्षीय रुपसा बतब्याल हिने ‘सुपर डान्सर चॅप्टर -3’चा किताब जिंकला आहे. या विजयानंतर तिला ट्रॉफी आणि 15 लाखांचे बक्षिण देऊन गौरवण्यात आले.

‘सुपर डान्सर’ची ट्रॉफी जिंकल्यानंतर रुपसा म्हणाली की, ‘विजयी झाल्यानंतर मला मस्त वाटत असून मी आनंदात आहे. मला डान्स करायला आवडते आणि यापुढेही हे सुरुच राहिल. मला आता कोलकातामध्ये जाऊन कुटुंबासोबत याचा जल्लोष करण्याचे वेध लागले आहेत.’

‘सुपर डान्सर चॅप्टर -3’च्या ग्रँड फिनालेमध्ये रुपसा बतब्याल, तेजस वर्मा, सक्षम शर्मा, जयश्री गोगोई आणि गौरव सव्ण यांनी जागा बनवली होती. या ग्रँड फिनालेत प्रसिद्ध गायक हिमेश रेशमिया आणि जावेद अली यांनी देखील आपली कलाकारी दाखवली. तसेच या शो ची जज शिल्पा शेट्टी हिनेही आपल्या डान्स परफॉर्मन्सने प्रेक्षकांची मनं जिंकली. शिल्पाने यावेळी भरतनाट्ट्यम केले.

आपली प्रतिक्रिया द्या