ज्येष्ठ साहित्यिका वासंती ठाकूर यांचे दुःखद निधन

477

आगरी समाजातील काही मोजक्या स्त्री साहित्यिकांपैकी एक,ज्येष्ठ समाजसेविका, ‘अग्रसेन ‘ या मासिकाच्या माजी संपादिका वासंती ठाकूर यांचं वयाच्या 78 व्या वर्षी कामठा – उरण येथे त्यांच्या राहत्या घरी रविवारी दुःखद निधन झालं. गेले आठ -नऊ महिने त्या आजारीच होत्या. त्यांच्या अशा अकाली जाण्याने आगरी समाजावर विशेष करून आगरी साहित्य जगतावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अंत्यविधीसाठी बोरी येथील स्मशानभूमीत सर्वच स्तरातील नागरिक उपस्थित होते.

आगरी बोली भाषेवर त्याच बरोबर आगरी संस्कृतीवर वासंती ठाकूर यांचे निस्सीम प्रेम होते. त्यांनी गजरा (कथासंग्रह ), उफल्या (कादंबरी ), घरट (ललित ), तुळस मंजिरी, स्मृतीगंध (कविता ), उरणचा इतिहास, आगरी लोकगीतांतील भावसौंदर्य , तुला स्मरून (आत्म कथन ) त्या शिवाय अंध मुलांकरिता ब्रेल लिपीत पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी जवळ जवळ बारा पुस्तकांची निर्मिती केलेली आहे.त्यांना साहित्य क्षेत्रातील त्याच बरोबर सामाजिक क्षेत्रातील 50 हून अधिक मानाचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या