पाईपलाईन फुटून उरणमध्ये दोन तास पाणी पुरवठा बंद

416

जेएनपीटी ते नवघर दरम्यान गुरुवारी सकाळी एमआयडीसीची पाण्याची 24 इंचाची पाईपलाईन फुटून लाखो लिटर्स पाणी वाहून गेले. दोन तास दुरुस्ती साठी पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. त्यामुळे उरणकरांना पाण्यासाठी दुरुस्ती होईपर्यंत वाट पाहावी लागली. जेएनपीटी ते नवघर दरम्यान एमआयडीसीची गुरुवारी सकाळी अचानक पाईपलाईन फुटली. त्यामुळे जेएनपीटी ते नवघर दरम्यान रस्त्यावर पाणी पाणी वाहत होतं. थंडीमुळे वेल्डींगला तडा गेल्याने पाईपलाईन फुटली असल्याची माहिती उरण एमआयडीसीचे उपअभियंता रणजित बिरंजे यांनी दिली. फुटलेली पाण्याची पाईपलाईन दोन तासातच दुरुस्ती करण्यात आली. दुरुस्ती दरम्यान दोन तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता अशीही माहिती बिरंजे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या