उर्फी जावेद पुन्हा झळकणार बिग बॉसमध्ये? वाचा बातमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या भन्नाट फॅशन सेन्सने लोकांचं लक्ष वेधून घेणारी आणि कधी कधी त्यामुळे वाद ओढवून घेणारी उर्फी जावेद आता बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वात झळकणार आहे. गंमत म्हणजे उर्फी बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या पर्वात सहभागी झाली होती. त्यावेळी ती लवकर बाहेर पडली. त्यानंतर दुसऱ्या पर्वात ती अखेरच्या टप्प्यात सहभागी होणार आहे.

बिग बॉस ओटीटीच्या सेटबाहेर दिसल्याने उर्फीच्या सहभागाच्या चर्चा रंगल्या आहेत. आपल्याला या पर्वातील मनिषा आणि अभिषेक हे दोन स्पर्धक आवडत असल्याचं उर्फी म्हणाली आहे. त्याखेरीज एल्विश हा स्पर्धक आवडत असल्याचं तिने म्हटलं आहे. तसंच, पूजा भट्ट ही देखील चांगली असल्याचंही ती म्हणाली आहे. हा कार्यक्रम आपल्या अंतिम टप्प्यात असून 14 ऑगस्ट रोजी या कार्यक्रमाचा विजेता घोषित करण्यात येणार आहे.