सावधान! युकेच्या समुद्रकिनाऱ्यावर दिसला धोकादायक मासा; पर्यटकांना सतर्कतेचा इशारा

समुद्री कासव आणि माशांच्या विविध प्रजातींचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी विविध प्रकारच्या मोहिम राबवण्यात येतात. मात्र, समुद्रात काही धोकादायक मासेही असतात. आता युकेच्या समुद्रकिनाऱ्यावर असाच एक धोकादायक मासा आढळल्याने पर्यटकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच या धोकादायक माशांना पुन्हा समुद्रात सोडण्यात येणार असून पर्यटकांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात येत असल्याचे कोस्टगार्डने म्हटले आहे.

यूकेच्या समुद्रकिनाऱ्यावर अत्यंत धोकादायक मासा दिसल्यानंतर पर्यटकांना तातडीचा ​​इशारा देण्यात आला आहे. पर्यटकांनी या माशांना स्पर्श करणे टाळावे. ते मासे मृत झाल्यानंतर ते डंख करू शकतात. तसेच त्यांचा डंख विषारी असल्याने पर्यटकांनी सावध राहवे, असे आवाहन करण्यात आले आहे. ब्रिटनमधील समुद्रकिनाऱ्यावर ‘पोर्तुगीज मॅन ओ’ वॉर किंवा ‘फ्लोटिंग टेरर्स’ नावाचा धोकादायक मासा आढळला आहे. त्यानंतर हा इशारा देण्यात आला आहे.

पोर्ट टॅलबोट कोस्टगार्डने पर्यटकांना सतर्क राहण्याचे आणि या माशांना स्पर्श करणे टाळण्याचे आवाहन केले आहे. हे मासे मृत झाल्यानंतरही विषारी डंख करू शकतात. अबेराव्हॉन बीचवर आणि पूर्वी पेम्ब्रोकेशायर, ग्वेनेड आणि अँगलसी किनाऱ्यावर हे मासे आढळले आहेत. पोर्तुगीज मॅन ओ वॉर अनेकदा जेलीफिशसारखे दिसतात. मात्र, ते विषारी डंख करू शकतात. त्यामुळे फोड,पुरळ येणे, ताप, आणि श्वसनाला त्रास होऊ शकतो. क्वचित प्रसंगी त्यांचे विषामुळे प्रकृती गंभीर होऊ शकते, जे जीवघेणे ठरू शकते. त्यामुळे ते निरुपद्रवी वाटत असले तरीही धोकादायक आहेत. त्यामुळे पर्यटकांनी सतर्क राहावे.

पोर्तुगीज मॅन ओवॉरला अनेकदा जेलीफिश समजले जाते. मात्र, ते धोकायदाक विषारी डंखकरणारे मासे आहेत. पोर्तुगीज मॅन ओ’वॉर सामान्यतः समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगतो. अनेकदा समुद्री शैवालमध्ये अडकतो. ते पोहू शकत नसले तरी, जोरदार वारे आणि वादळ त्यांना किनाऱ्यावर वाहू शकतात, त्यामुळे ते खराब हवामानानंतर समुद्रकिनाऱ्यांवर आढळतात. त्यामुळे पर्यटकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.