
सामना ऑनलाईन । मुंबई
संपूर्ण देशवासियांसाठी अभिमानाची बाब असलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित उरी या चित्रपटाचे पहिले गाणे आज प्रदर्शित झाले आहे. हे गाणे ऐकल्यानंतर नक्कीच तुमचा उर देशभक्तीने भरून येईल. या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता विकी कौशल हा जवानाच्या भूमिकेत दिसणार आहे.
The sound of pride,valour, triumph! The new anthem of new India. #Challa out now: https://t.co/kwrSjO3RSs#HowsTheJosh #URITheSurgicalStrike@yamigautam @SirPareshRawal @AdityaDharFilms @RonnieScrewvala @ZeeMusicCompany @shashwatology @vivekhariharan5 @MainHoonRomy @RSVPMovies
— Vicky Kaushal (@vickykaushal09) December 24, 2018
छल्ला गाण्यात विकी त्याच्या शहीद झालेल्या साथीदारांचा बदला घेण्यासाठी जवानांना ट्रेनिंग देताना दिसत आहे. कुमार यांनी लिहलेले हे गाणे रोमी, विवेक हरिहरण, शाशवत सचदेवने गायले आहे. आरएसव्हीपीची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य धार करणार आहे, या चित्रपटात विकी कौशल, यामी गौतम आणि परेश रावल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ११ जानेवारी २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.































































