तुम्ही खूप सुंदर दिसताय, पण स्मोकिंग सोडून द्या…, तुर्कीच्या राष्ट्रपतींचा सल्ला अन् मेलोनींच हटके प्रत्यु्त्तर चर्चेत

इजिप्तच्या शर्म अल-शेख रिसॉर्टमध्ये सोमवारी गाझा युद्ध संपवण्यासाठी आंतरराष्ट्रीय शांतता परिषद आयोजित करण्यात आली होती. गाझामध्ये सुरू असलेला संघर्ष थांबवणे आणि या प्रदेशात कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता. या परिषदेला तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तय्यिप एर्दोगान, जर्मन चान्सलर फ्रेडरिक मार्टिन, कतारचे अमीर, इजिप्तचे राष्ट्रपती, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि ब्रिटन, फ्रान्स आणि जॉर्डनचे प्रमुखही उपस्थित होते.

दरम्यान या परिषदेतील एर्दोगान आणि जॉर्जिओ मेलोनी यांचा एक व्हि़डीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. शिखर परिषदेदरम्यान एर्दोगान यांनी अनेक नेत्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी इटलीच्या पंतप्रधान ज्योर्जियो मेलोनी यांच्यासोबतही चर्चा केली. तेव्हा एर्दोगान यांनी मेलोनी यांना एक सल्ला दिला. तुम्ही खूप सुंदर दिसताय. पण तुम्हाला धुम्रपान सोडायला हवे…, असे ते म्हणाले. यावेळी शेजारी असलेले फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉनदेखील या हास्यविनोद  सहभागी झाले.

एर्दोगान यांच्या वक्तव्यावर मेलोनी यांनीही प्रतिक्रिया दिली. “मला माहित आहे, मला माहित आहे… पण जर मी धूम्रपान सोडले तर कदाचित माझं सोशल स्डॅंडड कमी होईल, असं तिने सांगितले. यावर एर्दोगान म्हणाले की तुर्की “धूम्रपानमुक्त भविष्यासाठी” काम करत आहे आणि ते जिथे जातील तिथे लोकांना धुम्रपान सोडण्यास प्रोत्साहित करतात. हा व्हिडीओ सोशल मीडिावर व्हायरल झाला आहे.