
अमेरिकेच्या हवाई दलाने सीरियात जोरदार हल्ले करून ईसिसचे तब्बल 70 अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. ईसिसच्या दहशतवाद्यांनी अमेरिकी सैनिकांवर केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून हे हल्ले करण्यात आल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
काही दिवसांपूर्वी ईसिसच्या दहशतवाद्यांनी अमेरिकेच्या सैनिकांवर हल्ले केले होते. त्यात दोन सैनिकांचा मृत्यू झाला होता. त्याचा बदला म्हणून अमेरिकेने ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’ राबवत ईसिसला दणका दिला. ‘ही युद्धाची सुरुवात नसून सूड आहे. अमेरिकी नागरिक व सैनिकांच्या सुरक्षेशी आम्ही कुठलीही तडजोड करणार नाही. आम्ही आज शत्रूचे अनेक अड्डे उद्ध्वस्त केले. हे ऑपरेशन सुरूच राहील,’ असे अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी स्पष्ट केले.


























































