अमेरिकेत ड्रग रॅकेटचा पर्दाफाश, दाऊद इब्राहीम आणि बॉलीवूडचे कनेक्शन

2196

अमेरिकेच्या ड्रग्ज एनफोर्समेंट एजेन्सीने  (DEA) ड्रग रॅकेटचा पर्दाफार्श केला आहे. या रॅकेटचे धागेदोरे कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम आणि बॉलीवूडशी जुळले असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

एका औषध निर्मिती करणाऱ्या हिंदुस्थानी कंपनीबरोबरही या रॅकेटचे तार जुळले आहेत. याप्रकरणी न्यूयॉर्कच्या एका न्यायालयात 25 जुलै रोजी सादर करण्यात आलेल्या तपास अहवालात दाऊदचा साथीदार आणि बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीचा पती विक्की गोस्वामी आणि अभिनेत्री किम शर्माचा पहीला पती अली पंजानी यांचा या र्रॅकेटशी संबंध असल्याचे सांगण्यात आले आहे. हिंदुस्थानमधील ही औषध कंपनी दाऊदचा साथीदार चालवत होता. या कंपनीत मॅड्रेक्स आणि एफेड्रिन सारख्या अंमली पदार्थांचे उत्पादन घेतले जात होते. असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

पंजानी आणि गोस्वामी एकत्र करत होते ड्रग्ज व्यवसाय

विक्की गोस्वामी आणि अली पंजानीवर केनियातून आंतरराष्ट्रीय स्तरावर अंमली पदार्थांची तस्करी केल्याचा आरोप आहे. ममताचा पती आणि दाऊदचा साथीदार असलेल्या विक्कीला दुबईतील न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. 2013 साली तुरुंगातून सुटका झाल्यानंतर विक्कीने केनियातून ड्रग्ज तस्करी सुरू केली होती. यावेळी त्याची ओळख पंजानीबरोबर झाली. त्यानंतर हे दोघे एकत्रितपणे अंमली पदार्थांचा व्यवसाय करू लागले. विक्कीने केनियात मॅड्रेक्स, कोकीन, हशीश, हेरॉईन आणि एफेड्रीनची तस्करी सुरू केली. त्यानंतर पंजानी हा धंदा पुढे नेते होते. विक्कीने केनियात मॅड्रेक्स, कोकीन, हशीश, हेरॉईन आणि एफेड्रीनची तस्करी सुरू केली. त्यानंतर पंजानी केनियातून पळून मुंबईत आला. येथे त्याला 2019 मध्ये बांद्रा येथील एशियन हार्ट इन्स्टीट्यूटमध्ये पाहीले गेले. मोबांसा पोलीसांना पंजानी बेकायेशीररित्या ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी हवा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या