पित्याने केले मुलीला स्तनपान, व्हिडीओ व्हायरल

4052

आई बाळाला स्तनपान करते ही सामान्य बाब आहे. पण जर पिता बाळाला स्तनपान करत असेल तर. ऐकूनच हे मजेशीर व विचित्र वाटते. पण सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एका चिमुरडीला तिचे वडील स्तनपान करत असल्याचे दिसत आहे. 17 नोव्हेंबरला हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. आतापर्यंत तब्बल 47 लाख लोकांनी हा व्हिडीओ बघितला आहे. अनेकांनी पित्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

ट्विटर यूजर @_SJPeace_ (StanceGrounded) याने हा 8 सेकंदाचा व्हिडीओ टि्वीट केला आहे. तसेच त्याखाली त्याने लिहले आहे की हीची आई आता घरात नाहीये. त्यात ही बाटलीने दूधही पित नाहीये. म्हणूनच मला ही फसवणूक करावी लागली आहे. हे इतके मजेशीर आहे की मला रडायला येत आहे. डॅड ऑफ द इयर असेही StanceGrounded याने लिहले आहे. मुलगी सरळ बाटलीने दूध पित नसल्याने StanceGrounded ने डोकं लढवतं बाटली शर्टात लपवली व मुलीला मांडीवर घेऊन ते तिला स्तनपान करावे तसे बाटलीतले दूध पाजत असताना या तसेच या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या