इराण हादरले! तेहरानमधील रहिवासी भागांवर अमेरिका-इस्रायलचे भीषण हवाई हल्ले; 13 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्यपूर्वेत युद्धाचा भडका उडाला असून अमेरिका आणि इस्रायलने इराणची राजधानी तेहरानला लक्ष्य केले आहे. सोमवारी पहाटे तेहरानमधील बहारेस्तान भागात झालेल्या एका भीषण हवाई हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिका आणि इस्रायलने ‘किलेह मीर’ या निमशहरी भागातील दोन निवासी इमारतींना लक्ष्य केले. हवाई हल्ल्यामुळे इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. हा परिसर अत्यंत दाट लोकवस्तीचा असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे, असे वृत्त स्थानिक माध्यमांच्या हवाल्याने ‘इंडिया टूडे‘ने दिले आहे.

ट्रम्प सैरभैर… शिव्या हासडल्या; होर्मुझवरून पुन्हा धमकी, इराणचा नरक बनवेन! हल्ल्याची वेळ सांगितली… उद्या रात्री 8 वाजता

अमेरिका आणि इस्रायलय्या लढाऊ विमानांनी तेहरानमधील एका निवासी भागावर बॉम्ब टाकले. यात 13 जणांचा जागीच मृत्यू झाला. बॉम्ब वर्षावामुळे इमारत कोसळली असून त्याचा ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक दबले असण्याची शक्यता आहे. निवासी भागात झालेल्या या हल्ल्यामुळे इराणमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

दरम्यान, ‘शरीफ युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी’वरही हवाई हल्ला झाल्याचा आरोप इराणच्या माध्यमांनी केला आहे. विद्यापीठ परिसर आणि जवळच असलेल्या नैसर्गिक वायू वितरण केंद्रावरही जोरदार प्रहार करण्यात आले आहेत. या आगीच्या ज्वाळा संपूर्ण शहरातून दिसत असून तेहरानमध्ये भीतीचे वातावरण आहे. एवढेच नाही तर इराणचे धार्मिक केंद्र असलेल्या ‘कोम’ शहरावरही क्षेपणास्त्रे डागण्यात आली असून यात 5 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

अमेरिकी सैनिकाचे इराणमधील 48 तास; शत्रूपासून लपण्यासाठी 70 हजार फूट उंचीवर चढाई

बातमी अपडेट होत आहे…