कॅलिफोर्नियात शाळेत गोळीबार, 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू

707

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये ‘साऊगस’ या शाळेत गुरुवारी सकाळी विद्यार्थ्याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. नॅथियल बेरहाऊ (16) असे आरोपी विद्यार्थ्याचे नाव आहे. गुरुवारी तो वाढदिवस साजरा करण्यासाठी शाळेत गेला होता. पण वर्गात गेल्यावर त्याने बॅगमधून पिस्तुल काढली व समोर बसलेल्या विद्यार्थी मित्रांवर बेछूट गोळीबार केला. त्यानंतर त्याने स्वत:वरही गोळ्या झाडल्या. यात तोही गंभीर जखमी झाला आहे. अवघ्या सोळा सेकंदात नॅथियलने आपल्या 5 मित्रांवर गोळ्या झाडल्या.

गोळीबारात जखमी झालेल्या 5 विद्यार्थ्यांमध्ये दोन 16 वर्षांच्या विद्यार्थीनीचा समावेश आहे. तर 14 वर्षाच्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हल्लेखोर नॅथियलने 45 कॅलिबर पिस्तुलमधून आपल्याच वर्गमित्रांवर गोळीबार केला.

अमेरिकेत गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून गेल्या महिन्यात ऑक्टोबरला कॅन्सास शहरात एकाने गोळीबार करत चारजणांची हत्या केली होती. तर टेक्सासमद्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या गोळीबाराच्या घटनांमध्ये 44 जणांचा मृत्यू झाला होता. यावर्षी अमेरिकेत गोळीबाराच्या तब्बल 40 घटना घडल्याचे समोर आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या