
जगातील आठ युद्धे थांबवल्याचा दावा करणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता अफगाणिस्तान व पाकिस्तानकडे मोर्चा वळवला आहे. या दोन देशांत सध्या सुरू असलेला संघर्ष सोडवण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. माझ्यासाठी हे सोपे काम आहे, असे ते म्हणाले. व्हाईट हाऊसमध्ये झेलेन्स्की यांच्या भेटीच्या वेळी पत्रकारांशी ते बोलत होते.