चीनला आणखी 90 दिवस करसवलत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला दिलेल्या कसवलतीत आणखी 90 दिवसांची वाढ केली आहे. चीननेही करामध्ये बदल करणार नसल्याचे म्हटले आहे. चीनला देण्यात आलेली ही करसवलत 10 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे.

दोन्ही देशांमधील करारांतील सर्व बाबी एकसारख्याच असतील असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. चीनसोबत सुरू असलेल्या असमान व्यापारावर चर्चा सुरू असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या करयुद्धादरम्यान, अमेरिकेने चीनवर 145 टक्के तर चीनने अमेरिकेच्या उत्पादनांवर 125 टक्के कर सुरुवातीच्या काळात लादले होते. आता अमेरिकेने चीनवर 30 टक्के तर चीनने अमेरिकेच्या आयात उत्पादनांवर 10 टक्के कर लावला आहे.