
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प १३ ते १५ मे दरम्यान चीनचा अधिकृत दौरा करणार असल्याची घोषणा सोमवारी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने केली.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची ही गेल्या जवळपास नऊ वर्षांतील पहिलीच चीन भेट असेल.
हा दौरा दीर्घकाळ सुरू असलेले अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध, होर्मुझची सामुद्रधुनी रोखल्यामुळे निर्माण झालेले जागतिक ऊर्जा संकट आणि तैवानसह अनेक मुद्द्यांवरून दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर होत आहे. पीटीआयने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे.





























































