अमेरिकेचा चीनला दणका, तिबेटला स्वतंत्र देशाचा दर्जा देण्याचे विधेयक संसदेत सादर

8023

जगावर सत्ता गाजविण्याची महत्वकांक्षा असलेल्या दोन महासत्तांमध्ये सध्या कोरोना व्हायरसवरून वाद सुरू आहेत. ही महामारी चीनने पसरवली असेल, तर चीनला त्यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल अशी धमकीच अमेरिकेने दिली आहे. असे असतानाच आता अमेरिकेने चीनला आणखी एक दणका दिला आहे. तिबेटला स्वतंत्र देशाचा दर्जा देण्याचे एक विधेयक अमेरिकेच्या संसदेत सादर झाले आहे. त्यामुळे आता अमेरिका व चीनमध्ये यावरून महायुद्धच होईल अशी शक्य़ता आतंरराष्ट्रीय स्तरावर वर्तवली जात आहे.

अमेरिकेचे रिपब्लिकन ऑफ पेनस्लेवानियाचे खासदार स्कॉट पेरी यांनी हे विधेयक संसदेत सादर केले आहे. तिबेट सोबतच त्यांनी हाँगकाँगलाही स्वतंत्र देशाचा दर्जा देण्याचे दुसरे विधेयक सादर केले आहे. हे दोन्ही विधेयक परराष्ट्र मंत्रालयाच्या समितीकडे पाठविण्यात आले आहेत. त्यानंतर पुन्हा ते विधेयक सिनेटर्सच्या मंजूरीसाठी येईल. तिथे मंजूर झाल्यानंतर ते राष्ट्राध्यक्षांच्या सहीसाठी पाठविण्यात येईल.

आपली प्रतिक्रिया द्या