ऑपरेशन आधी महिला रडू लागली, हॉस्पिटलने रडण्याचे घेतले पैसे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एक महिला शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचली. ऑपरेशन करताना ती महिला काहीशी भावुक झाली आणि तिला रडू कोसळलं. हॉस्पिटलने मात्र जेव्हा महिलेच्या हातात शस्त्रक्रियेचे बिल दिले तेव्हा त्या बिलात चक्क रडण्याचे पैसे आकारले. अमेरिकेतील ही घटना आहे. या प्रकाराने महिलेला मोठा धक्का बसला. तिने हॉस्पिटलच्या बिलाचा पह्टो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मिज असे या महिलेचे नाव आहे. ती चेहऱयावरील तीळ काढण्याच्या शस्त्रक्रियेसाठी गेली होती. ही शस्त्र्ाक्रिया सुरू असताना ती घाबरून गेली होती. तिला रडू कोसळलं होतं. शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिच्या हाती सोपवलेलं बिल जेव्हा तिने पाहिलं तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसला. हॉस्पिटलने महिलेला जे बिल दिले, त्यामध्ये रडण्याचे दर आकारले होते. ‘ब्रीफ इमोशन’ असे नाव देऊन 11 डॉलर म्हणजे 815 रुपये आकारण्यात आले. या प्रकाराने हैराण झालेल्या महिलेने सोशल मीडियावर आपला अनुभव शेअर केला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले बिल पाहून नेटिझन्सनी या ट्विटवर कमेंट्स करत हॉस्पिटल प्रशासनावर टीका करायला सुरुवात केली.