चीनच्या पाच कंपन्या अमेरिकेच्या काळ्या यादीत

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

अमेरिकेने सुपरकम्प्युटिंग क्षेत्रात कार्यरत चीनच्या पाच कंपन्यांकर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपन्या लष्कराशी संबंधित उपकरणांची निर्मिती करणाऱ्या असल्याने राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहचण्याची शक्यता आहे म्हणून हा निर्णय घेतल्याचे अमेरिकेने सांगितले आहे.

बंदी घातलेल्या कंपन्यांमध्ये ‘सुगो’च्या तीन सहयोगी कंपन्या आणि कुक्सी जियांगनान इन्स्टिटय़ूट ऑफ कम्प्युटिंग टेक्नॉलॉजी आदी कंपन्यांचा समावेश आहे. अमेरिकेच्या वाणिज्यिक किभागाने दिलेल्या माहितीनुसार या कंपन्यांच्या हालचाली अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला आणि विदेश नीतीसाठी धोकादायक असल्याचे आढळून आले आहे. सुगो आणि कुक्सी जियांगनान इन्स्टिटय़ूट ऑफ कम्प्युटिंग टेक्नॉलॉजी या कंपन्यांकर चायनीज आर्मी रिसर्च इन्स्टिटय़ूटचा वरदहस्त असून या कंपन्यांच्या उपकरणांचा उपयोग लष्करी आधुनिकीकरणासाठी केला जातो. चिनी कंपन्यांकडून उत्पादित करण्यात येणाऱ्या उपकरणांचा वापर न्युक्लिअर सिम्युलेशन, मिसाईल ट्रजेक्टर्स, हायपरसॉनिक अल्गोरिदम आदींसाठी करण्यात येतो अशी माहिती तांत्रिक विश्लेषक पॉल ट्रियालो यांनी दिली.