इंटरनेटशिवाय वापरा गुगल मॅप

1613

कुठल्याही अनोळखी ठिकाणी प्रवास करताना इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी गुगल मॅपला सर्वाधिक पसंती दिली जाते. हे ऍप कापरण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता असते. अनेकदा नेटवर्कच्या समस्येमुळे प्रकाशांना अडचणी येतात. मात्र काही सोप्या पद्धतींनी गुगल मॅप आता ऑफलाईन देखील वापरता येणार आहे.

आयओएस आणि ऍण्ड्रॉईड युजर्सना काही सोप्या पद्धती कापरून हे ऑफलाईन पद्धतीने गुगल मॅप वापरता येईल. ऑफलाईन मॅप वापरण्यासाठी युजर्सना सर्वात आधी गुगल मॅप उघडून साईन इन करावे लागेल. यावेळी मात्र इंटरनेट कनेक्शन सुरू ठेवावे लागेल. त्यानंतर जिथे जायचे असेल ते ठिकाण सर्च करा. ठिकाण सर्च केल्यावर डाऊनलोड ऑफलाईन मॅपवर टॅप करा. मॅप डाऊनलोड करण्यापुर्वी तुमच्या मोबाईलमध्ये पुरेसे स्टोरेज उपलब्ध आहे का याची खात्री करून घ्या.

आपली प्रतिक्रिया द्या