दिवाळीत भेसळयुक्त मिठाई ओळखण्यासाठी या टिप्सचा वापर करा, वाचा

दिवाळी आणि मिठाई हे नातं खूप वर्षांपासून दृढ आहे. परंतु दिवाळीत मात्र अनेकदा आपण मिठाईतील भेसळीमुळे त्रस्त असतो. भेसळयुक्त मिठाई खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्यासही धोका असतो. भेसळयुक्त मिठाई ही अनेकदा विषारी असते त्यामुळे आपल्या जीवालाही धोका असतो.

चांगल्या आणि भेसळयुक्त मिठाईमध्ये फरक कसा करायचा हे ओळखणे खूप गरजेचे आहे. भेसळयुक्त मिठाई अनेकदा आपल्याला चांगल्या पॅकिंगमध्ये मिळते. त्यामुळे आपल्याला ही चांगली मिठाई आहे का भेसळयुक्त हेही कळत नाही.

सणासुदीच्या काळात भेसळयुक्त आहे का ते तपासण्यासाठी या टिप्स फॉलो करा.

मिठाईवरील चांदीचे काम अनेकदा भेसळयुक्त असते. हे ओळखण्यासाठी त्या कामावर कॉस्टिक सोड्याचे काही थेंब टाकावे. हा चांदीचा वर्ख अॅल्युमिनियमचा असेल तर लगेच वितळेल. शिवाय या मिठाईचा छोटा तुकडा जाळल्यास, त्याची राख झाली तर ही मिठाई भेसळयुक्त आहे.

तुपापासून बनवलेल्या मिठाई देखील भेसळयुक्त असतात. गरम केल्यावर या मिठाई गडद तपकिरी होतात आणि त्यांना एक वेगळा वास येतो.

एखादी मिठाई प्लेटवर ठेवल्यानंतर किंवा खाल्ल्यानंतर तुमच्या हातावर किंवा तोंडावर रंग सोडली तर ती भेसळयुक्त आहे. मिठाईमध्ये फॅब्रिक रंग असतात, अन्नात घालणारे रंग नाही.

बाजारात उपलब्ध असलेल्या पॅकेज केलेल्या मिठाईंची कालबाह्यता तारीख तपासा. ज्या मिठाईचा स्वाद वेगळा आहे त्या स्पष्टपणे भेसळयुक्त आहेत.

भेसळयुक्त मावा वापरून बनवलेल्या मिठाई ओळखण्यासाठी, फिल्टरवर आयोडीनचे काही थेंब टाका. ते काळे झाले तर मावा भेसळयुक्त आहे. मावा खूप दाणेदार असेल आणि रबरासारखा ताणलेला असेल तर तो बनावट असण्याची शक्यता देखील आहे.