
आपल्या आजूबाजूला असं कुणीच नसेल की, जो म्हणेल त्याला बिर्याणी आवडत नाही. बिर्याणी हा असा पदार्थ आहे की, नाव ऐकताच तोंडला पाणी सुटते. व्हेज असो वा नाॅनव्हेज बिर्याणीची मज्जा काही औरच आहे. प्रत्येकाची बिर्याणी बनवण्याची पद्धत वेगळी असली तरी, बिर्याणी ही परफेक्ट होणं खूप गरजेचं आहे. रेस्टाॅरंट स्टाइल बिर्याणी कशी करावी याकरता काही टिप्स लक्षात ठेवणं हे गरजेचं आहे. भातामध्ये पाण्याचे प्रमाण लक्षात ठेवावे.
बिर्याणी करताना या टिप्स लक्षात ठेवा
बिर्याणी भात बनवण्यासाठी पाणी सर्वात महत्वाचे आहे. भातामध्ये जास्त पाणी असल्यास, बिर्याणी चिकट होईल.
बिर्याणीमध्ये पाण्याचे योग्य प्रमाण ठेवणं महत्त्वाचे आहे. तांदळाच्या प्रकारावर आधारीत पाण्याचे प्रमाण ठेवावे.
बिर्याणीमध्ये याखनी खूप महत्त्वाची भूमिका बजावते. तुमची यखनी बरोबर नसेल तर बिर्याणीची चव चांगली राहणार नाही.
बिर्याणी याखनी करताना, त्यामध्ये भाज्यांचे योग्य प्रमाण असायलाच हवे.
बिर्याणी याखनी बनवताना, बडीशेप आणि धणे दोन्हीचे प्रमाण समप्रमाणात असायला हवे.
याखनी करताना त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट ही गरजेची आहे. नाहीतर बिर्याणी चविष्ट होणार नाही.
याखनीमध्ये सर्व मसाले आणि बडीशेप-धणे कापडाच्या गठ्ठ्यात बांधून वापरा. तसेच, पाण्याचे प्रमाण लक्षात ठेवा आणि बिर्याणी बनवण्यासाठी हे पाणी वापरा.
बिर्याणीची चव वाढवण्यासाठी टोमॅटोसोबत दह्याचा वापर करा.