
सामना प्रतिनिधी । अबुधाबी
पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत संयमी शतक झळकावत ऑस्ट्रेलियासाठी मोलाची कामगिरी बजावणारा उस्मान ख्वाजा याला दुखापत झाली आहे. त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हिंदुस्थान व ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आगामी काळात होणार्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला तो मुकणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.




























































