UTT season 4 – फ्रॅंचायझीनी निवडले तगडे खेळाडू, मुंबईकर दिया चितळेची ‘यू मुंबा’मध्ये एन्ट्री

अल्टीमेट टेबल टेनिस (UTT) चा चौथा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. याच निमित्ताने शुक्रवारी मुंबईतील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया प्लेअर ड्राफ्ट पार पडला. प्रत्येक फ्रँचायझीने हिंदुस्थानी आणि विदेशी खेळाडूंची सांगड घालण्याचा प्रयत्न केला असून तगडे खेळाडू निवडले आहेत. त्यामुळे यंदाचा हंगाम रंगतदार होणार यात शंकाच नाही. तब्बल साडे तीन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर होत असणाऱ्या या स्पर्धेत एकूण 6 संघ एकमेकांशी झुंजताना दिसणार आहेत.

यंदाच्या स्पर्धेचे खास आकर्षण असणार आहे मुंबईकर दिया चितळे. अल्टीमेट टेबल टेनिस स्पर्धेत ती पहिल्यांदा खेळताना दिसणार आहे. 20 वर्षीय दियाला यू मुंबाने आपल्या संघात घेतले आहे. दिया ही मुंबईचीच असून घरच्या संघाकडूनच तिला पदार्पणाची संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करून आगामी काळात ऑलिम्पिकमध्येही देशासाठी पदक मिळवण्याचे स्वप्न असल्याचे दियाने सांगितले.

बंगळुरू स्मॅशर्स – Manika, Batra, Kirill Gerassimenko (Kazakhstan), Sanil Shetty, Natalia Bajor (Poland), Poymantee Baisya, Ankur Bhattacharjee

चेन्नई लायन्स – Sharath Kamal, Yangzi Liu (Australia), Benedikt Duda (Germany), Sutirtha Mukherjee, Payas Jain, Prapti Sen

दबंग दिल्ली टीटीसी – Sathiyan G, Sreeja Akula, Barbora Balazova (Slovakia), Ayhika Mukherjee, Anirban Ghosh, Jon Persson (Sweden)

गोवा चॅलेंजर्स – Suthasini Sawettabut (Thailand), Harmeet Desai, Alvaro Robles (Spain), Reeth Tennison, Kwittwika Sinha Roy, Anthony Amalraj

पुणेरी पलटन टीटीसी – Omar Assar (Egypt), Manush Shah, Archana Kamath, Snehit SFR, Anusha Kutumbale, Hana Matelova (Czech Rep.)

यू मुंबा टीटी – Manav Thakkar, Lily Zhang (US), Aruna Quadri (Nigeria), Diya Chitale, Mouma Das, Sudhanshu Grover

दरम्यान, पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात 13 ते 30 जुलै दरम्यान हा हंगाम खेळला जाणार. याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 वर केले जाईल आणि Jio सिनेमावर पाहायला मिळेल.