उत्तरप्रदेश – हाथरस, बलरामपूरनंतर आता भदोईमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, दगडाने ठेचून केली हत्या

प्रातिनिधिक फोटो

उत्तरप्रदेशमधील हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जात असताना बलरामपूर येथे सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली.या दोन मुलीच्या मृत्युच्या काही तासानंतरच पुन्हा एकदा उत्तर प्रदेश हादरले असून भदोईमध्ये एका 14 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. बलात्कारानंतर या मुलीचे डोके दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली.

भदोई जिल्ह्यातील गोपीगंज तालुक्यातील तीवारूपूर गावातील एक चौदा वर्षीय मुलगी नैसर्गिक विधींसाठी शेतात गेली होती. बराच वेळ झाला ती घरी न परतल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली असता. तिचा रक्ताने माखलेला मृतदेह शेतात आढळून आला. या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून त्यानंतरच बलात्कार झाला की नाही हे निश्चित होईल.

आपली प्रतिक्रिया द्या