मायावतींचा स्वबळाचा नारा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mayawati-new

आगामी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येथे होणाऱया विधानसभा निवडणुका बहुजन समाज पार्टी (बसपा) स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी रविवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. तर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या एमआयएमसोबतच्या युतीच्या चर्चेलादेखील त्यांनी यावेळी पूर्णविराम लावत हे वृत्त तथ्यहीन असल्याचे त्यांनी जाहीर केले.

बहुजन समाज पार्टीतर्फे काही दिवसांपूर्वी पंजाबच्या निवडणुकीसाठी अकाली दलाबरोबर हातमिळवणी केल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता उत्तर प्रदेशात होणाऱया निवडणुकीसाठी बसपा ओवीसी यांच्या एमआयएम पक्षाबरोबर निवडणूक लढविणार असल्याचे वृत्त गेल्या काही दिवसांपासून प्रसारित केले जात आहे. या वृत्ताचे खंडन करीत मायावतींनी अशा प्रकारची कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट केले. तर पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सतीशचंद्र मिश्र यांना पक्षाच्या मीडिया सेलचे राष्ट्रीय समन्वयक पदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याची घोषणाही मायावतींनी यावेळी केली.