अकरावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या,कारण ऐकाल तर तुम्हीही हादराल

3308

उत्तर प्रदेशमधील मैनपुरी जिल्ह्यात अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अनुष्का पांडे असे मृत विद्यार्थिनीचे नाव होते. ती भोगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिकत होती. ‘माझ्या शाळेच्या विद्यार्थिनी मला कधीही माफ केले नाही आणि सतत माझा अपमान करीत राहिले, असे तिने मुत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत लिहिले आहे. तिचा एका छोट्या चुकीसाठी सातत्याने अपमान केला जात होता.

अनुष्काची हत्या झाली आहे असा आरोप अनुष्काच्या आईने केला आहे. त्या म्हणाल्या की, डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केल्यानंतरही त्यांना शाळेच्या शिक्षक आणि प्रशासकीय विभागाने घटनेची माहिती कुटुंबियांना दिली नव्हती असा आरोप मुलीच्या आईने केला आहे. नातेवाईकांकडून त्यांना मुलीच्या मृत्यूची बातमी समजल्याचे अनुष्काच्या आईने सांगितले आहे. आमच्या नातेवाईकाने अनुष्काचा मृतदेह स्ट्रेचरवर पडलेला पाहिला आणि सकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांनी याबद्दल आम्हला माहिती दिली. माझ्या मुलीच्या अंगावर जखमेच्या खुणा आहेत. रविवारी सायंकाळी सात वाजता माझं माझ्या मुलीसोबत फोनवर बोलणं झालं होते. तिच्या सोबत ती व्यवस्थित बोलत होती. आमचा फोन झाल्यानंतर नेमकं काय झालं, त्याचा पोलिसांनी तपास करावा असं अनुष्काच्या आईने म्हटलं आहे.

‘आम्ही तिला जिल्हा रुग्णालयात नेत असताना सर्व प्रशासकीय विभागाला आणि पोलिसांना कळविले होते’, असे याप्रकरणी या शाळेतील मुख्याध्यापिका सुषमा सागर म्हणाल्या आहेत. मुलीच्या आई-वडिलांना हे का सांगितले गेले नाही असे पत्रकारांनी त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, त्यावेळी मुलीचा श्वास सुरु होता. दरम्यान, मैनपुरी सहायक पोलिस अधीक्षक अजय शंकर राय यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतरच कळू शकेल.

अनुष्काने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. या चिठ्ठीमध्ये तिने लिहिले आहे की ‘तीन वर्षापूर्वी झालेल्या चुकीसाठी गेल्या न माझा अपमान करून मला शिक्षा दिली जात आहे. मी कोणाशीही कधीच खोटे बोलले नाही. जे माझ्या जवळचे होते त्यांनी माझ्याशी संबंध तोडून टाकले. माझ्या वर्गमित्रांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही तर मी इयत्ता बारावीपर्यंत येथे कसे राहू’

अनुष्काने वर्गातील एका विद्यार्थ्याचा शेव-फरसाणाचा पुडा चोरला होता ज्यासाठी तिला त्रास दिला जात होता. तिच्या वर्गमित्रांपैकी एकाने पत्रकारांना सांगितले की, तीन वर्षांपूर्वी तिला चोरी करताना पकडलं गेल्यावर वर्गातील 48 विद्यार्थ्यांनी तिला थोबाडीत मारली. शाळेतील सिनियर विद्यार्थ्यांनी तिला ही शिक्षा केली होती. ही घटना शिक्षक व मुख्याध्यापकांनाही माहिती होती पण त्यांच्याकडून कोणतीही कारवाई केली गेली नव्हती. अनुष्का इयत्ता सहावीपासूनच जवाहर नवोदय विद्यालयत शिकत होती. ती एक हुशार विद्यार्थिनी होती आणि तिला डॉक्टर बनण्याची इच्छा होती. दहावीमध्ये तिने 92.8% गुण मिळवले होते असं अनुष्कासोबत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या