
उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात एक किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. येथे पुन्हा एका हॉटेलच्या आचाऱ्याने आपल्य थुंकीचा वापर करून चपाती बनवल्याचे उघड झाले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मेरठ पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. तसेत भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोएब असे या मुलाचे नाव असून तो कुरळी गावातील रहिवाशी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उपनिरीक्षक शिवकुमार शर्मा आणि कॉन्स्टेबल ब्रजेश आणि कुलदीप यांच्या पथकाने जानी कालव्याच्या पुलाजवळ शोएबला अटक केली.या प्रकरणात आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले.
दरम्यान, जेवणात थुंकीचा वापर केल्याचे हे पहिले प्रकरण नाही. यापूर्वीही असे प्रकार समोर आले आहेत. या वर्षी फेब्रुवारीमध्येही असेच एक प्रकरण समोर आले होते.21 फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशातील मेरठ येथील एका लग्न समारंभात थुंकीचा वापर करून रोट्या बनवण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले.