उत्तर प्रदेशात मंदिरातच सेवेकऱ्याचा गळा चिरला

प्रातिनिधिक फोटो

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे राज्यातील गुंडगिरीला वेसण घालण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. योगींच्या राज्यात मंदिरांचे सेवेकरीही सुरक्षित राहिले नाहीत. मिर्झापूर जिल्हय़ातील एका गावात शिवमंदिराच्या सेवेकऱ्याची मंदिरातच गळा चिरून हत्या करण्यात आली. सकाळी भाविक दर्शनासाठी आल्यानंतर हा रक्तरंजित थरार उघडकीस आला.

मिर्झापूर जिल्ह्यातील धौरहरा गावात शिवमंदिर आहे. मुन्ना राम सजीवन सरोज (25) हा या मंदिरात सेवेकऱ्याचे काम करतो. रात्री जेवण झाल्यानंतर तो मंदिरात झोपण्यासाठी आला. मंदिराच्या ओवरीत तो झोपला. सकाळी साडेपाच वाजता एक महिला पुजेसाठी आली असता मुन्ना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याचा गळा धारदार शस्त्राने चिरण्यात आला होता. महिलेने आरडाओरड करताच ग्रामस्थ गोळा झाले. मुन्नाचे नातलगही आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, गावकऱ्यांनी नवरात्रात नरबळी दिल्याची शंका व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या