
दिवंगत संगीतकार अरुण पौडवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणार कृतज्ञता गौरव पुरस्कार या वर्षी ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर यांना जाहीर झाला आहे. स्मृतिचिन्ह आणि 51 हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या 10 मे रोजी सायंकाळी 7 वाजता गायिका अनुराधा पौडवाल यांच्या घरी होणाऱया छोटेखानी कार्यक्रमात उत्तरा केळकर यांना पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. पुरस्काराचे यंदाचे 28 वे वर्ष आहे. उत्तरा केळकर यांच्या गायन कारकीर्दीला 53 वर्षे पूर्ण झाली असून आजवर त्यांनी 12 भाषांमध्ये 425 हून अधिक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. त्यांचे ‘उत्तर रंग’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.