उत्तराखंड आणि जम्मू कश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोमवारी केंद्रशासित प्रदेश लेह-लडाखला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला. ‘नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजी’कडून मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता 4.6 रिश्टर स्केल मोजण्यात आलीय. भूकंपामुळे कोणत्याही नुकसानीचे वृत्त अद्याप नाही.

गेल्या महिन्यातही लडाखला अनेकदा भूकंपाचे झटके बसले होते. तसेच गेल्या महिन्यात सलग दोन दिवस 21 मे आणि 22 मे रोजी लडाखला भूकंपाचा धक्का बसला होता. या भूकंपाची तीव्रता 4.2 आणि 3.6 रिश्टर स्केल अशी मोजण्यात आली होती. आज जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता अगोदरपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे.

जम्मू-कश्मीरलाही भूकंपाचा धक्का

तसेच गत आठवड्यात जम्मू-कश्मीरच्या डोडा जिल्ह्यालाही भूकंपाचा धक्का बसला होता. दुपारी 3.47 मिनिटांनी जाणवलेला हा भूकंपाचा धक्का 3.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. यामुळे बरेच नागरिकही धास्तावले होते. जम्मू कश्मीर आणि लडाख हा भाग भूकंपप्रवण क्षेत्रात येतो. भूकंपाची शक्यता अधिक असल्याने नागरिकांना सतत अलर्ट राहण्याची सूचना करण्यात आली होती.