उत्तरकाशी भागात हिमस्खलन; 10 जणांचे मृतदेह आढळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंड येथे पर्वतीय भागात हिमवृष्टी सुरू झाली आहे. येथील द्रौपदी का डांडा परिसरात हिमस्खलन झाल्याने नेहरू पर्वतारोहण संस्थेचे 29 प्रशिक्षणार्थी ट्रेकर्स अडकल्याची माहिती मिळत होती. त्यापैकी 10 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत.

दोन पर्वतांमधील खाचेत हे गिर्यारोहक अडकले होते. या ट्रेकर्सना वाचवण्यासाठी एनआयएम, एनडीआरएफ, एसडीआरएफ, आयबीटीपी यांची बचाव पथकं घटनास्थळी पोहोचली. उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी सैन्याकडे मदत मागितल्याने सैन्याचे जवानही बचाव करण्यासाठी आले.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अडकलेल्या गिर्यारोहकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केल्या आहेत. तसेच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त केली आहे.