उत्तराखंडमध्ये विरारमधील सातजण अडकले

उत्तराखंडमध्ये विरारमधील सात पर्यटक अडकून पडले आहेत. त्यांचे कुटुंबीय संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र सर्वांचे फोन स्वीच ऑफ असल्याने नातेवाईक चिंताग्रस्त झाले आहेत. विरार येथे राहणारे दोन कुटुंबातील सात सदस्य 31 जुलै रोजी उत्तराखंड येथे गेले होते होते. 13 ऑगस्टला त्यांचा पुन्हा विरारमध्ये पोहोचण्याचा बेत होता. दीपक कोटकर (53), शुभांगी कोटकर (48), शौनक कोटकर (24), शार्विल कोटकर (20), सुरेश येवले (52), अंकीत येवले (25), नयना येवले (44) अशी उत्तराखंडमध्ये अडकलेल्या सातजणांची नावे आहेत.