
उत्तराखंडमध्ये पावसाने पुन्हा एकदा हाहाकार माजवला आहे. राज्यातील अनेक भागात ढगफुटी झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली असून आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे.
नैनिताल जिल्ह्यातील रामगढ जिल्ह्यात ढगफुटी झाली असून अनेक भागातील रस्ते दुकाने, हॉटेल या पूरात वाहून गेले आहेत. मुसळधार पावसाने वेगवेगळ्या भागात दरड कोसळणं, पूरामुळे रस्ते पूल वाहून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. काही घरं देखील वाहून गेली आहेत. या घटनांमध्ये आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
नैनिताल जिल्ह्याचा संपर्क तुटला
अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नैनिताल जिल्ह्याला बसला आहे. नैनितालला जोडणारे तीन मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्याने तेथील वाहतूक थांबविण्यात आली आहे.
रिसॉर्टवर अडकले 200 पर्यटक
रामनगर रानीखेत मार्गावरील लेमन ट्री रिसॉर्टमध्ये 200 हून अधिक पर्यटक अडकले आहेत.




























































