‘CISF’मध्ये 12 वी पाससाठी नोकरीची मोठी संधी; 81 हजारापर्यंत असणार पगार

1587

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) ने हेड कॉन्स्टेबल (GD) स्पोर्ट्स कोट्यात 12वी उत्तिर्ण उमेदवारांसाठी भरती काढली आहे. या पदासाठी CISF ने अधिसूचना जाहीर केली आहे. ज्यात यासंबंधित संपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 14 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर आहे. अर्ज करण्याआधी खाली दिलेली बातमी काळजीपूर्वक वाचा.

CISF मध्ये हेड कॉन्स्टेबल (जीडी) च्या 300 पदांसाठी भरती काढली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना लेव्हल – 4 वेतनमानानुसार 25,500 – 81,100 रुपये पगार देण्यात येईल.

पात्रता

उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून बारावी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच क्रीडा व अ‍ॅथलेटिक्स मध्ये राज्य / राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व केलेलं असावं. 01.08.2019 नुसार उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 23 वर्षे असावे.

किती आहे अर्ज शुल्क 

या पदाकरिता अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांना 100 रुपये फी भरावी लागले.  तर अनुसूचित जाती / जमाती / महिला / पीडब्ल्यूडी उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. परीक्षा शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगद्वारे दिले जाऊ शकते.

अर्ज कसा करावा

या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना त्यांची सर्व कागदपत्रे सीआयएसएफ कार्यालयात पाठवावी लागतील. उमेदवारांची निवड चाचणीच्या आधारे केली जाईल. अधिक माहितीसाठी अधिसूचना पहा.

अधिसूचना पाहण्यासाठी येथे करा ‘क्लिक

आपली प्रतिक्रिया द्या