
आमदार विठ्ठल चव्हाण प्रतिष्ठान आणि जसलोक रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यामाने लालबाग परळ विभागातील नागरिकांना मोफत कोविशिल्ड लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली आहे. परळ येथील डॉ. शिरोडकर हायस्कूल येथे शुक्रवार 3 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत 18 वर्षांवरील नागरिकांना पहिला आणि दुसरा डोस देण्यात येणार आहे. तरी स्थानिकांनी या लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. या कार्यक्रमास शिवसेना शाखा क्र. 203 आणि सुभाष डामरे मित्र मंडळाचे सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन उपविभागप्रमुख पराग चव्हाण यांनी केले असून मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, बेस्ट समितीचे आशिष चेंबूरकर उपस्थित राहणार आहे.

























































