
सोलापूर जिल्ह्यात 1144 गावे असून, यांतील 101 गावांमध्ये कोविड लसीकरणाचा वेग अत्यंत कमी आहे. या गावांचा आढावा घेऊन या गावांतील लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सायंकाळी आदेश काढून 101 अधिकाऱयांची नेमणूक केली आहे. या अधिकाऱयांना दररोजच्या लसीकरणाचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.
सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत 72 टक्के लोकांनीच लस घेतली आहे. 28 टक्के नागरिकांनी अद्यापि एकही लस घेतलेली नाही. त्यामुळे एकही लस न घेतलेल्या व दुसरी लस न घेतलेल्यांना लस घेण्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे. आगामी काळात लस न घेणाऱयांवरील निर्बंध वाढविण्याचे सूतोवाचही करण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक क्षेत्र असलेल्या पंढरपूर, मंगळवेढा या शहरांसह अकलूज, माढा, वैरागसारख्या दाट लोकवस्ती असलेल्या शहरांत लसीकरणाचा वेग अत्यंत कमी असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.




























































