
ICC Under 19 Men’s World Cup हिंदुस्थानच्या यंग ब्रिगेडने जिंकला आणि विजेतेपदाचा खणखणीत षटकारी ठोकला. इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या वादळाचा इंग्लंडला जबर तडाखा बसला. 80 चेंडूंमध्ये 175 धावांची तडाखेबंद खेळी त्याने केली. या तडाख्यात इंग्लंडचा पालापाचोळा झाला आणि टीम इंडियाने सहाव्यांदा 19 वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला. वैभवसह कनिष्क चौहान आणि हेनिल पटे यांनीही वर्ल्ड कपमध्ये नेत्रदिपक कामगिरी केली. त्यामुळे या तिघांची ICC च्या सर्वोत्तम 19 वर्षांखील संघात निवड करण्यात आली आहे.
ICC ने 19 वर्षांखालील सर्वोत्तम संघाची निवड केली असून वर्ल्ड कप विजेत्या हिंदुस्थानी संघातील तिघांची या संघात निवड करण्यात आली आहे. तर उप विजेत्या इंग्लंडच्याही तिन खेळाडूंची या संघात निवड करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त श्रीलंका, अफगानिस्तान, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानच्या खेळाडूंची सुद्धा या सर्वोत्तम संघात निवड झाली आहे. ICC च्या या सर्वोत्तम संघाची धुरा इंग्लंडच्या यष्टीरक्षक कर्णधार थॉमस रेव याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. या सर्वोत्त संघात हिंदुस्थानचे वैभव सूर्यवंशी, हेनिल पटेल आणि कनिष्क चौहान, इंग्लंडचे थॉमस रेव, बेन मेयस, मॅनी लम्सडेन, श्रीलंकेचा विरान चामुदिता, अफगानिस्तानचे फैसल खान शिनोजादा, नूरिस्तानी ओमरजई, वेस्ट इंडिजचा विटेल लॉज आणि पाकिस्तानच्या विटेल लॉज यांचा समावेश आहे.



























































