
सायकल चालवण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱया वैभववाडीतील नितांत चव्हाण या दहावीतील विद्यार्थ्याची दखल मुलांसाठी काम करणारी जागतिक संघटना असलेल्या युनिसेफने घेतली आहे. ‘हिरवे जगू, हिरवे जपू’चा संदेश देणाऱया नितांतवरील विशेष लेखाचा समावेश ‘चरखा युनिसेफ’ या प्रकल्पाच्या वेब पोर्टलवर जागतिक पर्यावरण दिनी प्रसिद्ध करण्यात आला आहे.
वैभववाडी तालुक्यातील वरवडे-फणसवाडी गावचा रहिवाशी असलेला नितांत हा एस.एम. हायस्कूलमध्ये शिक्षण घेतोय. पर्यावरणस्नेही सायकलपटू म्हणून तो लोकप्रिय आहे. लहानपणापासून सायकलिंगची आवड असलेल्या नितांतने सहावीत असताना राष्ट्रसेवादलने आयोजित केलेल्या मिरज-राधानगरी-फोंडा-कणकवली-मालवण-देवगड-वैभववाडी ते मिरज या सायकल रॅलीत सहभागी होऊन पाच दिवसांत 480 कि.मी.चा सायकल प्रवास पूर्ण केला होता. ‘कणक रायडर्स’सोबत त्याचा सायकलिंगचा प्रवास सुरू असतो.
एकाच दिवसात एकटय़ाने 200 कि.मी. सायकलिंग करण्याचे स्वप्नही त्याने पूर्ण केले आहे. आपल्या अनेक मित्र-मैत्रिणींना त्याने या सायकल वेडात सामील करून घेतलंय. कणकवली ते पणजी-खारेपाटण-कणकवली असा 300 कि.मी.चा सायकल प्रवासही त्याने 24 तासांत पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे सायकलिंग करताना तो पर्यावरण वाचवण्याचा, त्याचे संवर्धन करण्याचा संदेश देतो. युनिसेफच्या अधिकृत वेब पोर्टलवर स्थान मिळवलेला या वर्षीचा महाराष्ट्रातील तो एकमेव सायकलपटू विद्यार्थी ठरला आहे. त्यामुळे जिह्यातून सर्वच स्तरातून त्याचे काwतुक होत आहे.
कच्च्या रस्त्यामुळे वाढली निसर्गाशी जवळीक
सायकलमुळे नितांतची निसर्गाशी जवळीक वाढली आहे. सायकल प्रवासात डांबरी गुळगुळीत रस्त्यापेक्षा कच्च्या पायवाटा त्याला अधिक खुणावतात. हमरस्ता सोडून झाडांनी भरलेल्या दाट वनराईत तो सहज शिरतो. वर्षभर साठवलेल्या बिया या भटपंतीदरम्यान माळरान आणि टेकडय़ांवर उधळून देतो. भविष्यात सायकलवरून प्रवास करत राज्य आणि देश समजून घेण्याची त्याची इच्छा आहे.

























































