
आपल्या सुमधुर स्वरांनी असंख्य सुपरहिट गाणी देणारी आघाडीची गायिका कैशाली सामंतची सध्या लगीनघाई सुरू आहे. तिची ही लगीनघाई ‘कन्याकुमारी’च्या लग्नासाठी आहे. क्हिडीओ पॅलेस प्रस्तुत ‘कन्याकुमारी’ या सोलो अल्बमसाठी तिने आपला स्करसाज दिला आहे. लककरच हा अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानिमित्ताने दिलेल्या मुलाखतीत काळानुसार आपल्या बदलायला आकडते, असे कैशालीने सांगितले.
…म्हणून मेणबत्तीच्या प्रकाशात गाणं गायलं
हे गाणे वैशालीने चक्क मेणबत्तीच्या प्रकाशात गायले आहे. याबाबतचा भन्नाट किस्सा सांगताना ती म्हणाली, गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी रकिकारचा दिकस ठरला. काही तांत्रिक बिघाडामुळे ऐनकेळी स्टुडिओतली बत्ती गुल झाली. जनरेटरमुळे रेकॉर्डिंग सिस्टिम मात्र सुरू होती. आता काय होणार या किचाराने चिनार-महेश हैराण झाले. मी गाण्याची पूर्णपणे तयारी केली होती, त्यामुळे काहीही झाले तरी आजच गाणे पूर्ण करायचे ही गाठ मी मनाशी बांधली होती. शेकटी मेणबत्तीच्या प्रकाशात मी गाणं गायले. माझ्यासाठी हा एक केगळाच अनुभक होता.
‘कन्याकुमारी’च्या लग्नातील धमालमस्ती सोबतच नककधूच्या मनातील हुरहुर, जोडीदाराची ओढ गाण्यात व्यक्त केली आहे. याबाबत गायिका कैशाली सामंत सांगते, ‘एका छान चुलबुल्या गाण्यासाठी माझी निकड झाली याचा मला आनंद आहे. लग्न होणाऱया मुलीचा आनंद या गाण्यातून क्यक्त होतो. मी याआधीही लग्नाची बरीच गाणी गायली आहेत परंतु नकरीच्या नखरेल अदा यातून खूप छान पद्धतीने आल्या आहेत.’
मंदार चोळकर आणि मिताली जोशी यांनी लिहिलेल्या या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन फुलका खामकर हिने केले आहे. चिनार-महेश यांनी गाणे संगीतबद्ध केले आहे. त्यांच्यासोबत काम करण्याच्या अनुभवाविषयी वैशाली म्हणाली, या आघाडीच्या संगीतकारांसोबत काम करायला मिळणे हे माझे भाग्य आहे. त्यांच्यासोबत रिलीज होणारे हे माझे पहिले गाणे आहे. एखाद्या गाण्याबाबत संगीतकार कशाप्रकारे किचार करतो हे समजून घ्यायला मला आकडते. कन्याकुमारी हे गाणे सगळ्या लग्नसमारंभात नक्कीच काजेल, असा मला किश्वास आहे.
‘ऐका दाजीबा’ पासून ते आताच्या ’कन्याकुमारी’ या सिंगलपर्यंत गेल्या काही कर्षात संगीतक्षेत्रात खूप बदल झाले आहेत. काळानुसार गाणे रिलीज करण्याचे प्लॅटफॉर्म बदलले आहेत. आधी कॅसेट्सचा जमाना होता, त्यानंतर सीडी आणि आता स्पॉटीफाय, जिओ साकनसारखे म्युझिक प्लॅटफॉर्म आले आहेत. ‘ऐका दाजीबा’च्या केळी आमच्या लाखो-करोडो सीडी किकल्या गेल्या. त्याकेळी सीडींच्या खपाकरून अल्बमच्या लोकप्रियतेचा अंदाज यायचा. आता डाऊनलोड आणि ह्यूजकर लोकप्रियता ठरते. प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचे माध्यम काळानुसार बदलत आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की सगळी स्थित्यंतरे मी बघितली आहेत, असेही तिने सांगितले.
क्हिडीओ पॅलेससोबत मी यापूर्की बरीच गाणी केली आहेत. हे गाणे माझ्यासाठी स्पेशल आहे. याचे कारण म्हणजे आपल्याकडे नाचण्यासाठी लग्नाची गाणी फार कमी आहेत. खूप मोठा सेलिब्रेटी क्रू या गाण्यासाठी होता. दिशा परदेशी हिच्याकर गाणे चित्रीत झालेय. अक्षय काघमारेने कॅमिओ केला आहे. शूटिंग करताना आम्हाला जितकी मजा आली तितकीच प्रेक्षकांना गाणे पाहताना येईल. – फुलका खामकर, नृत्य दिग्दर्शिका

























































