
नवीन वर्षाचे औचित्य साधून माता वैष्णो देवीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱया भाविकांसाठी माता वैष्णो देवी श्राईन बोर्डाने काही नवे नियम लागू केले आहेत. आता भाविकांना रेडिओ फ्रेक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डीवाईस (आरएफआयडी) कार्ड जारी झाल्यानंतर वैष्णो देवीची यात्रा 10 तासांत सुरू करावी लागणार आहे. त्याचबरोबर ही यात्रा आता 24 तासांत पूर्ण करावी लागणार आहे. हे निर्देश तत्काळ लागू करण्यात येणार आहेत.


























































