वंदे भारत ट्रेनची क्रेझ कमी झाली! प्रवासी संख्या घटली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-सोलापूर गाडीला सर्वाधिक फटका
‘सेमी हायस्पीड ट्रेन’ अशी ओळख असलेल्या वंदे भारत ट्रेनची व्रेझ महाराष्ट्रात काहीशी कमी झाली आहे. गाडी सुरू झाली तेव्हा सुरुवातीच्या टप्प्यात एप्रिल-मे महिन्यात भरभरून धावणाऱया वंदे भारतची प्रवासी क्षमता सरासरी पंधरा-सोळा टक्क्यांनी घटली असून सर्वाधिक फटका छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सोलापूरदरम्यान धावणाऱया गाडीला बसला असून मे महिन्याचा विचार करता सध्या 20-25 टक्के एवढय़ा मोठय़ा प्रमाणात प्रवासी कमी झाले आहेत. वंदे भारतचा प्रवास आरामदायी असला तरी त्यासाठी लागणारा वेळ आणि तिकिटाची रक्कम पाहता प्रवासी इतर गाडय़ांकडे वळत असल्याचे दिसत आहे.

मध्य रेल्वेकडून सध्या महाराष्ट्रात मुंबई-शिर्डी, मुंबई-सोलापूर, मुंबई-गोवा आणि नागपूर-विलासपूर या मार्गावर वंदे भारत ट्रेन चालवल्या जात आहेत. मुंबई-गोवा वंदे भारत वगळता इतर तीनही गाडय़ा उन्हाळय़ापूर्वी सुरू झाल्या आहेत.

एप्रिल-मे महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सोलापूर या गाडीचे भारमान क्षमतेहून अधिक म्हणजे 125 टक्के एवढे होते. मात्र आता ते 95 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-शिर्डीदरम्यान धावणाऱया वंदे भारतचे भारमान 93 टक्क्यांवरून 80 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. वंदे भारतचे तिकीट इतर मेल एक्प्रेस गाडय़ांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे प्रवासी स्वस्त प्रवासाकडे वळत आहे. याबाबत मध्य रेल्वेकडे विचारणा केली असता एप्रिल-मेमध्ये उन्हाळी सुट्टय़ा असल्याने प्रवासी संख्या चांगली होती, मात्र सध्या शाळा-कॉलेज सुरू असून पावसाळाही असल्याने प्रवासी संख्येत काहीशी घट झाली. मात्र सण-उत्सव सुरू होताच ती पन्हा पूर्वपदावर येईल, असे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी सांगितले.

नागपूर-विलासपूर गाडीचे आठ डबे कमी केले
नागपूर-विलासपूर (मध्य प्रदेश) या मार्गावर सुरुवातीला 16 डब्यांची वंदे भारत ट्रेन चालवण्यात येत होती. तेव्हा 55-60 टक्के एवढे कमी भारमान होते. त्याची दखल घेत रेल्वे सध्या 16 डब्यांऐवजी 8 डब्यांची गाडी चालवत आहे. त्यामुळे आता गाडीचे भारमान 97 टक्के एवढे असल्याचे दिसत आहे.